SRPF in Marathi एसआरपीएफ ची माहिती

SRPF ची माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

एसआरपीएफ चे पूर्ण रूप स्टेट रिसर्व पोलीस फोर्स म्हणजेच राज्य राखीव पोलीस दल आहे आणि ह्या फोर्स ची स्थापना ६ मार्च १९४८ रोजी झाली आणि त्यामुळे या फोर्स चा रेसिंग डे ६ मार्च ला साजरा केला जातो , SRPF चे मुख्यालय पुणे येथे आहे आणि महाराष्ट्र राज्यातील सुव्यवस्था व कायदा राखण्याचे काम, तसेच महाराष्ट्रात विशेष ऑपरेशन्स चालवणे, राज्यातील विशेष अंतर्गत सुरक्षेमध्ये देखील SRPF फोर्स चे मोठे योगदान महाराष्ट्र राज्याला आहे. सर्वांत पहिले SRPF फोर्स चे पहिले पथक पुरंदर जिल्ह्या मध्ये होते आणि त्यानंतर १९५१ च्या अधी नियमान्वये SRPF या फोर्स चे संघटन करण्यात आले.

 

आम्हाला फॉलो करा

Telegram  WhatsApp

SRPF चे काम काय?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र राज्यामध्ये अशांतता व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ते हाताळण्याचे काम आधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेली SRPF फोर्स कडे सोपविण्यात आले आहेत.   

  • कायदा व सुव्यवस्था राखणे
  • महत्वाच्या स्थापनेची सुरक्षा
  • वनरक्षक आपत्ती व्यवस्थापन
  • दंगलीच्या ठिकाणी बंदोबस्त
  • राज्यातील निवडणुकांच्या ठिकाणी शांतता राखणे

SRPF चे महाराष्ट्रात एकूण किती गट आहे?

SRPF ह्या फोर्स चे महाराष्ट्र राज्यात एकूण १९ गट आहेत आणि प्रत्येक गट हा पोलीस अधीक्षक दर्जाचे ‘समादेशक’ म्हणजेच कमांडंट यांच्या नियंत्रण खाली येतात. खाली दिलेलं प्रमाणे या गटांची विभागणी दोन परिक्षेत्रांमध्ये करण्यात आली आहे.  एस आर पी एफ गट १९, भुसावळ जे की जळगाव जिल्ह्यात येते त्याऐवजी हे आता कुसळगाव ता. जामनेर येथे स्थापन झाले आहे.

पुणे पोलीस परिक्षेत्र SRPF
अ. क्र. राज्य राखीव पोलीस बलाचे गट स्थापना
राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट १, पुणे ६ मार्च १९४८
राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट २, पुणे ६ मार्च १९४८
राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट ५, दौंड १७ मे १९६५
राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट ७, दौंड ८ फेब्रुवारी १९६६
राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट ८, मुंबई ३० एप्रिल १९६१
राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट १०, सोलापूर १५ जून १९६५
राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट ११, नवी मुंबई १९९२
एस आर पी एफ  (IRB -३) गट १६, कोल्हापूर नोव्हेंबर २०११
पोलीस प्रशिक्षण केंद्र -नानाविज दौंड १ जानेवारी १९८८
नागपूर पोलीस परिक्षेत्र
 अ.क्र. राज्य राखीव पोलीस बलाचे गट स्थापना
१० राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट ३, जालना १९५६
११ राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट ४, नागपूर १ ऑगस्ट १९४७
१२ राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट ६, धुळे ९ नोव्हेंबर १९६५
१३ राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट ९, अमरावती २९ जून १९७४
१४ राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट १२, हिंगोली ३० जानेवारी १९९३
१५ राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट १३, गडचिरोली २० फेब्रूवारी १९९३
१६ एस आर पी एफ गट १४ (IRB -१) औरंगाबाद १ एप्रिल २००७
१७ एस आर पी एफ गट १५ (IRB -२)  गोंदिया १८ जून २००९
१८ एस आर पी एफ गट १७ (IRB -४) बल्लापूर (चंद्रपूर) सप्टेंबर २०१९
१९ एस आर पी एफ गट १८ (IRB -५) अकोला सप्टेंबर २०१९
२० एस आर पी एफ गट १९ कुसळगाव (अ. नगर) सप्टेंबर २०१९

SRPF चे महासंचालक कोण आहेत?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SRPF चे सध्याचे पोलीस महासंचालक संजय कुमार वर्मा हे आहेत.

राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कधी झाली?

राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना ६ मार्च १९४८ रोजी झाली होती. आणि सध्या महिलांसाठी राज्य राखीव पोलीस गट नागपूर काटोल ची स्थापना जुलै २०२० ला झाली. SRPF जवानांच्या उजव्या खांद्याच्या बाजूला गट क्रमांक दिलेला असतो.

महाराष्ट्रात किती पोलीस कर्मचारी आहेत?

महाराष्ट्र राज्यात एकूण २०८६७१ पोलीस कॉन्स्टेबल कर्मचारी कार्यरत आहेत आणि राज्य पोलीस सेवेमध्ये ऑफिसर्स लेवल ला २१२९१ इतके कर्मचारी आहेत. आणि एकूण जर पोलीस कर्मचारींची संख्या बघितली तर ती  २२९९६२ इतकी आहे.

SRPF च्या विशेष भूमिका

राष्ट्रीय सुरक्षा आणि सहकार्य

एसआरपीएफ दलाने विविध राष्ट्रीय संकटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहे किंवा अजूनही बजावत आहे. नैसर्गिक आपत्ती, दहशतवादी हल्ले आणि इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये एसआरपीएफने मोठे योगदान दिले आहे. केंद्र सरकारच्या विविध ऑपरेशन्समध्ये सहभागी होऊन राज्याबाहेरील मिशन्समध्येही योगदान दिले आहे.

SRPF प्रशिक्षण आणि विकास

एसआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या वापराचे प्रशिक्षण दिले जाते. नियमितपणे नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींच्या आधारे प्रशिक्षण अद्ययावत केले जाते.

एसआरपीएफचे यशस्वी ऑपरेशन्स

काही महत्त्वाचे ऑपरेशन्स

२००८ च्या मुंबई हल्ल्यांमध्ये एसआरपीएफने महत्वाची भूमिका बजावली. विविध दंगलींमध्ये आणि अनुशासन मोडणाऱ्या स्थितींमध्ये एसआरपीएफने शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली आहे.

SRPF चे सामाजिक उपक्रम

सामुदायिक विकास कार्यक्रम

एसआरपीएफ नियमितपणे विविध सामाजिक उपक्रम राबवते, जसे की रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, आणि शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये मदत करणे. एसआरपीएफच्या जवानांनी समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

भविष्यातील योजना आणि विस्तार

एसआरपीएफचे भविष्य

नवीन तंत्रज्ञानाच्या समावेशाने एसआरपीएफला अधिक सक्षम आणि प्रभावी बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये एसआरपीएफच्या उपस्थितीला अधिक मजबूत करण्याची योजना आहे.

एसआरपीएफमध्ये सामील होण्यासाठीच्या संधी

भरती प्रक्रिया

एसआरपीएफमध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि शारीरिक मापदंड याबद्दल माहिती. भरती प्रक्रियेतील विविध टप्पे :

टप्पे इव्हेंट पुरुष मार्क्स
शारीरिक मोजमाप | शारीरिक दक्षता चाचणी
उंची १६८ सेमी पेक्षा कमी नसावी
छाती | चेस्ट ७९ सेमी ते ५ सेमी फ़ुलवावी
५ किमी रनिंग २५ मिनिट च्या आत ५०
१०० मीटर रनिंग ११:५० सेकंड २५
गोळा फेक ८.५० मीटर २५
लेखी परीक्षा
विषय पेपर चे मार्क्स वेळ
मराठी २५ ९० मिनिटे
अंकगणित २५
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी २५
बुद्धिमत्ता २५
मेडिकल 
कागदपत्र पडताळणी 

जिद्द सरकारी रिजल्ट चॅनल  Telegram
 WhatsApp

SRPF मध्ये महिला सहभाग

महिला कर्मचार्यांची भूमिका

SRPF मध्ये महिलांच्या सहभागाचे प्रमाण वाढत आहे आणि विविध ऑपरेशन्समध्ये महिलांची सक्रिय भूमिका आहे. महिलांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आणि सुविधा उपलब्ध आहेत.

महिती पाठवा

Leave a Comment