चालू घडामोडी ३ मे २०२४ ¦ Current Affairs 2024
-
- अलीकडेच देशाच्या नौदल उपप्रमुख पदी कृष्णा स्वामीनाथन यांची निवड करण्यात आली आहे.
- एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ ट्रेनिंग कमांड या पदावर नागेश कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्रीलंका देशाच्या कांके संथुराई बंदराच्या विकासासाठी भारत देश आर्थिक मदत करणार आहे.
- IERDA ही नवरत्न दर्जा प्राप्त करणारी भारतातील १८ वी कंपनी ठरली आहे.
- पुणे येथे देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन ले. जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.
- एप्रिल महिन्यात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मासिक जीएसटी कर संकलन झाले.
- नील अर्थव्यवस्थेसाठी भारत आणि फ्रान्स देश एकत्र काम करणार आहेत.
- शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावाच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून त्याची अंमलबजावणी १ मे २०२४ पासून सुरू झाली आहे.
- स्मार्ट हे क्षेपनास्त्र DRDO संस्थेद्वारे विकसित करण्यात आले.
- सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत देश हा २२ व्या क्रमांकावर आहे.
|