CRPF Mahiti in Marathi

CRPF Information in Marathi


CRPF ची स्थापना का झाली

केंद्रीय राखीव पोलीस दल (सेंट्रल रिझर्व्ह पुलिस फोर्स) भारतातील सुरक्षा दलांपैकी एक सर्वांत मोठे केंद्रीय दल आहे, आणि भारतीय पोलीस सेवेतील हि फोर्स एक बहुउद्देशीय असून अनेक क्षेत्रांतील सुरक्षा, तपास हि फोर्स करते.सीआरपीएफ भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या (MHA) अधिकारात कार्यरत आहे, CRPF ची स्थापना २ जुलै १९३९ साली झाली आणि यांचा उद्देश अनेक सुरक्षेच्या कार्यात आंतरिक सुरक्षा प्रदान करणे, सीमावर्ती सुरक्षा आणि आणीबाणीच्या परिस्थितीत सुरक्षा, मदत देणे हा होता तसेच सीआरपीएफ विभिन्न क्षेत्रात तैनात करण्यात आली आहे जसे जम्मू आणि काश्मीर , छत्तीसगढ, प्रभावित क्षेत्र तसेच इतर भारत देशातील राज्यांत देखील CRPF ची सुरक्षा देण्यात आली आहे. CRPF चे बोधवाक्य “सेवा आणि निष्ठा” आहे , भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतर २ डिसेंबर १९४९ ला कायदा लागू करण्यासाठी CRPF म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दल बनले आणि निवडणूक काळात देखील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाने खूप मोठ्या प्रमाणात सुरक्षेचे कार्य निभावते.

सी आर पी एफ चे महत्व काय?

भारत देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सी आर पी एफ चे महत्व मोठे आहे, हि फोर्स एक विशेष सशस्त्र दल आहे जी विविध भागात सुरक्षा आणि शांतता राखण्यात महत्वाची भूमिका बजावते. सी आर पी एफ सीमा सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा, व्यावसायिक घटनांचा तपास आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कार्यवाही साठी हि फोर्स आहे. १९९९ च्या साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देखील आपण CRPF ची लाभलेली मोठ्या प्रमाणात सुरक्षितता बघून ह्या फोर्स चे महत्व समजू शकतो.

CRPF मधे किती बटालियन आहेत

CRPF च्या एकूण २४६ इतक्या बटालियन आहेत आणि सीआरपीएफ हे भारत देशातील सर्वांत मोठे अर्धसैनिक दल आहे. जर आपण CRPF चा इतिहास बघितला तर मध्य प्रदेश राज्यात निमच मध्ये दोन बटालियन ने CRPF ची स्थापना झालेली होती.

CRPF संरक्षण अंतर्गत येते का?

CRPF चा जर आपण इतिहास बघितला तर या फोर्स चा पूर्वी पासूनच मुख्य उद्देश हा होता कि भारत देशातील संवेदनशील राज्यांत असलेले ब्रिटिश रहिवासी यांचे संरक्षण करणे होता, ही पूर्वीपासूनच CRPF ची प्राथमिकता होती, म्हणून सी आर पी एफ नक्कीच ह्या उद्देशांमुळे संरक्षण अंतर्गत आहे असे म्हणता येईल.

CISF किंवा CRPF कोणते चांगले आहे?

CISF एक केंद्रीय औदयोगिक सुरक्षा दल आहे आणि हे एक केंद्रीय सशस्त्र दल देखील आहे , जर ह्या फोर्स चा विचार केला तर ही फोर्स

  • औदयोगिक क्षेत्र
  • खदानी
  • विमानतळ
  • मेट्रो स्टेशन

अणुऊर्जा प्रकल्प आणि इतर महत्वाचे सरकारी तसेच खाजगी क्षेत्रांतील सुरक्षा आणि सुविधा देण्याचे काम आहे.

आणि CRPF चा जर विचार केला तर हे भारत देशातील सर्वांत मोठे केंद्रीय सशस्त्र दलांपैकी एक आहे. आणि ह्या फोर्स कडे

  • अंतर्गत सुरक्षा
  • कायदा आणि सुव्यवस्था राखणे
  • इतर अंतर्गत कारवाया करणे
  • आपत्तीच्या ठिकाणी तात्काळ सुरक्षा पुरविणे

इत्यादी दोन्हीही फोर्स कामानुसार विभाजित झालेल्या आहेत आणि दोन्हींनी फोर्स आप-आपल्या जागी स्वतःची वेगळी ओळख देऊन आहेत म्हणून दोन्हीही फोर्स ला आपल्या आवडीनुसार आपण प्राधान्य देऊन त्यांची काम बघून आवड निवडू शकतो.

CISF ची माहिती : पहा jidd sarkari result jidd mahesh awhale

 

सी आर पी एफ किंवा बी एस एफ कोणते सर्वोत्तम आहे?

CRPF चा जर विचार केला तर हे भारत देशातील सर्वांत मोठे केंद्रीय सशस्त्र दलांपैकी एक आहे. आणि ह्या फोर्स कडे

  • अंतर्गत सुरक्षा
  • कायदा आणि सुव्यवस्था राखणे
  • इतर अंतर्गत कारवाया करणे
  • आपत्तीच्या ठिकाणी तात्काळ सुरक्षा पुरविणेहे आहेत

( BSF )सीमा सुरक्षा दल हे भारत देशातील सीमांचे संरक्षण करणारे दल आहे आणि सीमांना संरक्षण देणे हे BSF चे प्राथमिक कर्तव्य आहे तसेच

  • भारत देशाच्या सीमांचे रक्षण करणे
  • तस्करी
  • बेकायदेशीर इमिग्रेशन
  • इतर सीमापार गुन्ह्यांचा प्रतिकार करणे
  • युध्दाच्या काळात देशात शांतता राखणे

तर इत्यादी फोर्स नुसार कामांचे विभाजन झाले आहेत आणि प्रत्येक फोर्स फक्त आपल्या करत असलेल्या कामामुळे विभाजित आहेत.

सी आर पी एफ कॉन्स्टेबल चे काम काय?

CRPF म्हणजेच सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आणि ह्या फोर्स ला भारत देशातील अनेक प्रकारच्या सुरक्षा सोपविण्यात आल्या आहेत यामध्ये ह्या फोर्स ला सार्वजनिक लोकांची सुरक्षा राखणे, एखाद कायदा मंजूर झालेला असल्यास त्याची अंमलबजावणी करणे, सीमावर्ती सुरक्षा देणे त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा, मदत प्रदान करणे, सुरक्षेच्या ठिकाणी तपासणी करणे, शांतता राखणे, गुन्ह्यांचा तपास करणे आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ कार्यवाही करणे, विशेष ऑपेरेशन, आपत्ती निवारण, निवडणुकांमध्ये वाढीव सुरक्षा पुरविणे आणि कार्यक्रमांमध्ये सहायता देणे अश्या अनेकश्या सरकारी किंवा सामाजिक सुरक्षा , सुविधेचे काम CRPF फोर्स करते.

यामध्ये काही महत्वाचे :

  • दंगलीच्या ठिकाणी नियंत्रण ठेवणे
  • काऊंटर मिलिटरी/बंडखोरी ऑपरेशन
  • जमाव नियंत्रण
  • वामपंथी अतिरेक्यांना सामोरे जाणे
  • नैसर्गिक आपत्तीच्या वेळी बचाव आणि मदत कार्य

Leave a Comment