CISF Information in Marathi ¦ सीआयएसएफ ची माहिती
सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स ( केंद्रीय औदयोगिक सुरक्षा दल ) म्हणजेच सीआयएसएफ (CISF) फोर्स भारत देशातील एक केंद्रीय सशस्त्र दल आहे, ज्याची स्थापना १० मार्च १९६९ साली झाली आहे CISF चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे . CISF ह्या फोर्स ला मेट्रो स्टेशन , विमानतळ, अणुऊर्जा प्रकल्प, बंदर आणि औदयोगिक क्षेत्रातील अनेक ठिकाणी सुरक्षा तसेच सुविधा प्रदान करवण्याचे काम सोपवण्यात आले आहे. CISF काही सरकारी तर काही खाजगी क्षेत्रातील प्रकल्प तसेच उद्योगांना सुरक्षा पुरवणे ह्या प्राथमिकतेने काम करते. CISF ही फोर्स जगातील सर्वांत मोठी औदयोगिक सुरक्षा दलांपैकी एक आहे , तसेच ह्या फोर्स ला विशेष कौशल्य आणि प्रशिक्षण सह म्हणजेच ट्रैनिंग सह तैयार झालेली असल्यामुळे ह्या फोर्स ला विशिष्ट प्रतिष्ठानांची सुरक्षा देखील सोपविण्यात आलेली आहे.
CISF मध्ये भरती होण्यासाठी पात्रताCISF ही औदयोगिक क्षेत्रात सुरक्षा पुरवण्याचे काम करते आणि CISF मध्ये जर भरती व्हायचं असेल तर पदानुसार पात्रता देखील लागते म्हणून जर CISF कॉन्स्टेबल मध्ये भरती व्हायचं असेल उमेदवार हा १२ वी कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त बोर्डातून पास झालेला असावा , आणि CISF अधिकारी पदासाठी उमेदवार ग्रॅजुएट असावा आणि जर CISF Fire मध्ये फॉर्म भरायचा असेल तर उमेदवाराची १२ वी सायन्स मधून पास झालेला असावा. तसेच CISF जरी दरवर्षी भरती स्वतः घेत नसली तरी स्टाफ सिलेक्शन मार्फत दरवर्षी जागा काढते आणि यामध्ये भारत देशातील संपूर्ण पॅरामिलिटरी फोर्सस च्या जागा समाविष्ट असतात आणि दर वर्षी CISF कॉन्स्टेबल ची भरती करण्यासाठी स्टाफ सिलेक्शन ला कमिशन ला निवडलेले आहे. CISF मध्ये भरती होण्यासाठी वय मर्यादाCISF मध्ये भरती होण्यासाठी वय मर्यादा रँक आणि पदानुसार बदलते जर आपण कॉन्स्टेबल ची वयोमर्यादा बघितली तर वय वर्ष १८ पूर्ण असणे आवश्यक आहे आणि तुम्ही वयाच्या २३ वय वर्ष पर्यंत GD मध्ये भरती देऊ शकतात तसेच कास्ट नुसार दिल्या गेलेल्या सूट नुसार तुम्हाला सूट देखील दिली जाते यामध्ये SC/ST साठी ५ वर्षे सूट तर OBC कास्ट ला ३ वर्ष सूट दिली गेलेली आहे . CISF मध्ये भरती होण्यासाठी ची निवड प्रक्रियाCISF मध्ये भरती होण्यासाठी मुख्य त्या आपल्याला चार टप्यांतून पात्र होऊन जावे लागते त्यामध्ये पहिला जो टप्पा असतो तो ठरतो की , भरती स्वतः CISF घेते आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्या वेळेला स्वतः CISF फोर्स भरती घेते त्यावेळेला अगोदर असते ग्राउंड म्हणजेच शारीरिक पात्रता , त्यानंतर जो शारीरिक पात्रतेत पास झालेला उमेदवार असेल त्याला पेपर साठी प्रवेश पत्र येतात आणि लेखी झाल्या नंतर जो उमेदवार लेखी पास झालेला असेल त्याला मेडिकल चाचणी साठी बोलावण्यात येते तेव्हाच ओरिजनल डॉक्युमेंट पळताळणी साठी बोलावले जाते त्यानंतर फायनल मीरिट लागते जो उमेदवार प्रत्येक चाचणीत पात्र असेल त्याला जॉइनिंग साठी पोस्ट मार्फत आपल्या घरा पर्यंत CISF कडून जॉइनिंग लेटर पोहोचवण्यात येते. आणि जेव्हा CISF कॉन्स्टेबल ची भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन घेत असेल तेव्हा पण चार टप्यांतूनच जावे लागते पण अगोदर पेपर असतो जो उमेदवार पेपर मध्ये पास झालेला असेल त्या उमेदवाराला शारीरिक पात्रता चाचणी साठी हॉल तिकीट स्टाफ सेलेशन च्या ऑफिसिअल वेब साईट वर उपलब्ध करून दिले जातात आणि जो उमेदवार शारीरिक चाचणी परीक्षेसाठी पात्र असेल त्यांना ओरिजनल डॉक्युमेंट पळताळणी साठी बोलावले जाते जो उमेदवार डॉकमेण्ट मध्ये पात्र असेल त्या उमेदवाराला वैद्यकीय चाचणी म्हणजेच मेडिकल साठी बोलावले जाते मग नंतर फायनल लिस्ट लावली जाते ,ज्याचे फायनल लिस्ट ला नाव असेल तो उमेदवार जॉइनिंग साठी पात्र असतो आणि त्यालाच पोस्ट मार्फत जॉइनिंग लेटर देखील पाठवण्यात येते. CISF मध्ये भरती होण्यासाठी शारीरिक पात्रताCISF मध्ये भरती होण्यासाठी रनिंग ५ किमी इतकी असते आणि टायमिंग असतो २४ ते २५ मिनिट ह्या वेळेच्या आत जो उमेदवार ग्राउंड काढतो तो पुरुष उमेदवार छाती मोजण्या साठी पात्र असतो तसेच ज्या उमेदवाराने रनींग झालेली असेल त्यांची चेस्ट हि मोजली जाते नॉर्मल चेस्ट ८० सेमी इतकी पाहिजेल तर फुगवून छाती ८५ किंवा जास्त देखील चालते आणि उंची १७० सेमी इतकी असायला हवी. आणि जेव्हा स्टाफ सिलेक्शन भरती घेत त्या वेळेला पण ह्याच इव्हेंट ने भरती घेतली जाते पण फक्त चाचणींचा क्रम हा मागे पुढे असतो. CISF ला भरती होण्यासाठी लेखी परीक्षाCISF कॉन्स्टेबल ला भरती होण्यासाठी लेखी परीक्षा ही MCQ टाईप ची असते आणि यात चार विषयांचा समावेश असतो. गणित, बुद्धिमत्ता, हिंदी/English , GK ह्या चार विषयाचा त्यात समावेश असतो २५ मार्कांचा एक विषय अश्या चार विषयांचा मिळून एक पेपर १०० मार्कांचा असतो. आणि जर तुम्हाला अगदी योग्य अभ्यास करायचा असेल तर मागील वर्षांच्या प्रश्न पत्रिकेवर आधारित प्रश्नांची पातळी समजून मन अभ्यास करावा. CISF ला भरती होण्यासाठी मेडिकल चाचणीCISF मध्ये जर सिलेक्शन मिळवायचे असेल तर तुमचं शारीरिक दृष्ट्या फिट आणि निरोगी राहणे खूप जास्त महत्वाचे आहे, ज्या वेळेला तुम्ही शारीरिक चाचणी पार करून पेपर पास होऊन पुढची स्टेप असते ती डॉक्युमेंट आणि नंतर मेडिकल मेडिकल ला तज्ज्ञ डॉक्टर कडून तुमची शारीरिक चाचणी पूर्ण शरीराची केली जाते आणि यात जर तुम्ही कुठे अनफिट होत असाल तर तुम्हाला री मेडिकल साठी पाठवले जाते आणि रिमेडिकल जर तुमचा पॉईंट सॉल्व झाला तर तुम्ही CISF साठी पात्र असतात आणि जर रिमेडिकल ला बाहेर काढले तर तुम्ही या पदासाठी पात्र नाहीत असा याचा अर्थ आहे. म्हणून तुम्ही अगोदर कोणत्याही हॉस्पिटल ला पूर्व डेमो मेडिकल देखील करून खात्री मिळवू शकतात. CISF फोर्स चा पगारCISF ह्या फोर्स मध्ये कॉन्स्टेबल ला पगार सुरुवातीला २२५०० इतका मिळतो तर संपूर्ण सर्व्हिस दरम्यान हा ७०००० ते ८०००० हजार इतका होतो , तसेच कॅन्टीन सुविधा , मेडिकल हॉस्पिटल मध्ये सूट , इतर भत्ते मिळून सर्व्हिस आज नुसार एक कॉन्स्टेबल चा पगार मिळतो आणि इतर महागाई भत्ते देखील CISF कॉन्स्टेबल यांना दिले जातात. CISF ही सरकारी नोकरी आहे का? ¦ CISF chi MahitiCISF म्हटलं तर ही एक केंद्र सरकारची गृह मंत्रालया अंतर्गत येणारी फोर्स आहे म्हणून CISF ही सरकारी नोकरी आहे का तर याच उत्तर आहे हो, भारत देशा अंतर्गत असणारे अनेक सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील उद्योगांतर्गत शांतता तसेच सुरळीत पणे उद्योगांना सुरक्षा प्रदान करण्याचे कर्तव्य ही फोर्स करते. सीआयएसएफ (CISF) पोलिसांच्या अधीन आहे का?सीआयएसएफ ही एक पोलिसांच्या अधीन येणारी फोर्स आहे का, तर होय नक्कीच ही फोर्स केंद्रीय पोलिसांच्या अधीन येणारी फोर्स आहे. सी आय एस एफ भारत सरकारच्या उद्योगी क्षेत्रांवर सुरक्षितता देण्याला जबाबदार आहे तसेच उद्योगी संपत्तीवर सुरक्षितता हे सी आय एस चे आद्य कर्त्यव्य आहे. |