१६ फेब्रुवारी २०२४
- अलीकडेच ‘टॉप ऑफ युरोप म्हणून प्रसिद्ध असलेल्या जनफ्रॉजोच येथे नीरज चोप्रा गौरवण्यात आले.
- अबुधाबी मधील पहिल्या हिंदू मंदिराचे उदघाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
- दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम १० लाख रुपयांवरून १५ लाख करण्यात आली.
- अलेक्झांडर स्टब हे फिनलँड देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत.
- पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना अंतर्गत लाभार्थ्यांना ३०० युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे.
- आसाम राज्याने काजी नेमू ला राज्य फळ म्हणून घोषित केले आहे.
- अंटार्टिकाच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी चीन देशाने नुकतेच किनलिंग स्टेशन सुरु केले आहे.
- रेल्वे संरक्षण दल ६७ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन लखनौ शहरात करणार आहे.
- जपानला मागे टाकत जर्मनी देश जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.
- यंदा दयानंद सरस्वती यांची २०० वी जयंती साजरी करण्यात आली.
|