१५ फेब्रुवारी २०२४
- दक्षिण रेल्वे द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पहिल्या ट्रान्सजेंडर टीटीई सिंधू गणपती ठरल्या आहेत.
- लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने प्यारेलाल शर्मा यांना सन्मानित करण्यात आले.
- STEMM क्षेत्रात महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी स्वाती पोर्टल लॉन्च करण्यात आले.
- ३६ व राष्ट्रीय पुस्तक मेळा हैदराबाद शहरात आयोजित करण्यात येत आहे.
- भारतातील पहिले CDS जनरल बिपीन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण डेहराडून शहरात करण्यात आले.
- प्रिसिजन ऍप्रोच रडार चे उदघाटन आर हरी कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
- आफ्रिका कप ऑफ नेशन स्पर्धेचे विजेतेपद कोटे डी आयव्होर देशाने पटकावले आहे.
- जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी ओडिसा राज्यात सुरु करण्यात येत आहे.
- सरोजिनी नायडू यांची १३ फेब्रुवारी रोजी १४५ वी जयंती साजरी करण्यात आली.
- नुकतेच लेखिका उषा किरण खान यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले त्या मैथिली भाषेतील लेखिका होत्या.
- यावर्षीचा आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिवस १२ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला.
- जागतिक रेडिओ दिवस १३ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
|