चालू घडामोडी/ Current Affairs

१४ फेब्रुवारी २०२४


  • श्रीलंका देशातील कोलंबो येथे झालेल्या एशियन युथ गेम्स २०२४ मधील योग स्पर्धेत अंकित भोरडे यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे.
  • राष्ट्रीय आदिवासी महोत्सव आदी २०२४ नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे.
  • नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय आदिवासी महोत्सव २०२४ चे उदघाटन द्रौपदी मुर्मू  यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये द्विशतक झळकावणारा पथूम निसंका हा १० वा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला आहे.
  • महाराष्ट्र राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • सुमित नागल भारतीय टेनिस खेळाडूने ATP चॅलेंजर चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
  • देशातील पहिले ऑलिम्पिक भवन पुणे येथे साकारण्यात येणार आहे.
  • आसाम राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने जादूटोणा विरोधी कायद्याला मंजुरी दिली आहे.
  • नवी दिल्ली येथे आयोजित ५१ व्या जागतिक पुस्तक मेळाचा प्रमुख अतिथी सौदी अरेबिया हा देश आहे.
  • वर्ड गव्हर्मेंट समिट २०२४  १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान दुबई येथे होणार आहे.

 

Leave a Comment