चालू घडामोडी / Current Affairs २० फेब्रुवारी २०२४
- इंडोनेशिया देशाचे नवीन राष्ट्रपती प्रोबोवो सुबीयांतो बनले आहेत.
- सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे आता निरंजन शहा ह्या नवीन नावाने ओळखले जाणार आहे.
- UAE मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मरणार्थ अहलान मोदी नावाने सर्वात मोठी भारतीय समुदाय शिखर परिषद पार पडली.
- अलीकडेच ढाका शहरात खासी स्वतंत्रसैनिक ‘यु तिरोट सिंग’ यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
- उत्तराखंड राज्यात भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरु करण्यात येणार आहे.
- अलीकडेच राजस्थान राज्यात ८४० दशलक्ष टनांपेक्षा जास्त लोहखनिजांचे साठे आढळले आहेत.
- तेलगळतीमुळे अलीकडेच त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.
- भारत देश मिनीकॉय आणि आगत्ती बेट समूहावर नवीन नौदल तळ स्थापन करणार आहे.
- UN (युनायटेड नेशन्स) चा अरबी बिबट्याचा पहिला आंतरराष्ट्रीय दिवस १० फेब्रुवारी साजरा करण्यात आला.
|