चालू घडामोडी १५ मार्च २०२४

चालू घडामोडी / Current Affairs १५ मार्च २०२४

  • अलीकडेच मध्य प्रदेशाचा लोकायुक्तपदी न्यायमूर्ती सत्येंद्र कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली.
  • महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
  • नुकत्याच INS आंग्रे आणि INS अक्षय दोन नवीन युद्धनौका भारतीय नौदलात शामिल करण्यात आल्या.
  • पुणे जिल्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतर राजगड करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली.
  • अलीकडेच महाराष्ट्र राज्यातील १०० महाविद्यालयात सुरु केलेल्या कौशल विकास केंद्राला आचार्य चाणक्य नाव देण्यात आले.
  • इंडिया मोबाईल काँग्रेस २०२४ चे आयोजन ऑक्टोबर महिन्यात नवी दिल्ली येथे करण्यात येणार.
  • आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत ओडिसा राज्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १० टक्के महिला मतदान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • नुकतेच गुजरात येथील भरूच येथे नौदलासाठी आवश्यक असलेल्या बोलार्ड पूल टग चे अनावरण करण्यात आले त्याला बलजीत नाव देण्यात आले.
  • जम्मू आणि काश्मीर राज्यात महाराष्ट्र अतिथीगृह बांधण्यास मंत्री मंडळाने नुकतीच मान्यता दिली.
  • दरवर्षी जागतिक किडनी दिन १४ मार्च ला साजरा करण्यात येत असतो.

Leave a Comment